जळगाव – १९ फेब्रुवारी या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते; पण जळगाव येथील न्यायालय चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवस्था अतिशय बिकट असल्याचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी पुढे आणले आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सद्यःस्थितीत पुतळ्याची अवहेलना होत असून पुतळ्याच्या चबुतर्यावर भेगा पडल्या आहेत. पुतळ्यातील घोड्याचा लगाम आणि त्यात अडकवलेली कडीसुद्धा तुटलेली आहे. पुतळ्याजवळ अनेक चौकीदार असूनही महाविद्यालयाचे युवक इकडे येऊन वेळ घालवतात, हेही अयोग्य वाटते. शिवजयंतीच्या आधी पुतळ्याची रंगरंगोटी होणेही ही क्रमप्राप्त ठरते.
जळगाव जिल्हा परिषदेतील महात्मा गांधी यांच्या पुतळाही झाडपाल्याच्या आड लपल्याची आणि तो अस्वच्छ असल्याची तक्रार दारकुंडे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.