प्रयागराज, १ फेब्रुवारी (वार्ता.) – १ फेब्रुवारी या दिवशी पंचदशनाम जुना आखाड्याच्या १६ नूतन संन्यासिंनींनी नागा संन्यासिनींची, तर ११५ नूतन संन्यासींनी नागा साधूंची दीक्षा घेतली. सकाळच्या वेळेत सर्व नूतन संन्यासिनी गंगा नदीच्या काळावर दश स्नान, पिंडदान आदी विधी केले. त्यानंतर जुना पंचदशनाम आखाड्यामध्ये धर्मध्वजाला वंदन करून धर्मकार्यासाठी समर्पित होण्याची प्रतिज्ञा केली. रात्री उशिरा जुना आखाड्याचे महामंडलेश्वर आचार्य अवधेशानंद गिरिजी त्यांना गंगा नदीच्या काठावर सर्व नागा साधू आणि संन्यासिनी यांनी प्रार्थना केली.