Nirdesh Singh Arrested Hate Speech :हिंदूंच्या देवता आणि महाकुंभमेळा यांना शिवीगाळ करणार्‍या निर्देश सिंह हिला अटक

निर्देश सिंह

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – हिंदूंच्या देवता, संत आणि महाकुंभमेळा यांना  शिवीगाळ करणार्‍या निर्देश सिंह उपाख्य दीदी हिला नोएडा येथून अटक करण्यात आली. प्रमोद सैनी यांच्या तक्रारीवरून माझोला पोलीस ठाण्यात सिंह हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनीही देहली पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार केली होती. त्यावर कारवाई न झाल्याने त्यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केल्यावर न्यायालयाने पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला होता. (हिंदुद्रोही आणि हिंदुद्वेष्टे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना न्यायालयाचे दार ठोठवावे लागते, हे संतापजनक ! – संपादक) 


हे वाचा → Nirdesh Singh Hate Speech : (म्हणे) ‘महाकुंभ म्हणजे अश्‍लीलता; श्रीकृष्ण, श्रीराम गुन्हेगार !’