सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रमाणे साधकांप्रती अपार प्रीती असणारे आणि साधकांचे त्रास दूर करणारे सद्गुरु गाडगीळकाका !

सद्गुरु काका साधकांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांवर नामजपादी उपाय सांगतात. साधकांनी त्यांना अर्ध्या रात्रीही उपाय विचारले, तरी ते नामजपादी उपाय शोधून देतात. ते स्वतःचा विचार करत नाहीत. गुरुदेवांप्रमाणेच त्यांचेही मन साधकांप्रतीच्या प्रीतीने ओथंबलेले आहे.

सतारीवर ‘हंसध्वनी’ हा राग ऐकत असतांना कु. म्रिणालिनी देवघरे यांना जाणवलेली सूत्रे !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी २६.३.२०२२ या दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सतारीवर राग ‘हंसध्वनी’चे प्रत्यक्ष वादन केले. या रागाविषयी कु. म्रिणालिनी देवघरे यांनी केलेला अभ्यास आणि सतारीवर हा राग ऐकत असतांना त्यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

साधिका नामजप करत चारचाकी गाडीने जात असतांना झालेल्या भीषण अपघातात गुरुदेवांच्या कृपेने तिचे रक्षण होणे आणि तिच्या लक्षात आलेले नामजप करण्याचे महत्त्व !

‘२५.१२.२०१९ या दिवशी मी माझ्या चारचाकी गाडीने कार्यालयात जात होते. त्या वेळी मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत होते. अनुमाने सकाळी ७.३० वाजता पुणे येथील धायरी चौकात २५ आसनांच्या मोठ्या ‘माझदा’ गाडीने माझ्या चारचाकीला धडक दिली…

अक्कलकोट आणि गाणगापूर : अखंड भावावस्था अन् शांती यांची अनुभूती देणारी दिव्य दत्तक्षेत्रे !

अक्कलकोट येथे स्वामी समर्थांना अनुभवता येते. ते सगुण स्थान आहे. तर गाणगापूर येथे दत्तात्रेयांच्या पादुका आहेत, म्हणजेच ते निर्गुण स्थान आहे. त्यामुळे एकूणच गाणगापूर येथे शांतीची अनुभूती आली.

प्रामाणिक आणि कोणतीही परिस्थिती आनंदाने स्वीकारणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे चिंचवड (पुणे) येथील कै. प्रभाकर दामोदर ढवळे (वय ८५ वर्षे) !

कै. प्रभाकर ढवळे यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात झालेले पालट आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

साधकांवर प्रीतीचा वर्षाव करणारे आणि स्वतःच्या आचरणातून साधकांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टर प्रीतीचा सागर आहेत. त्यांनाच ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, याची तळमळ अधिक आहे. त्यांचे आचरण सर्व साधकांना आदर्शवत आहे. साधकाला घडलेले त्यांच्यातील गुणांचे दर्शन आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती यांविषयी येथे दिले आहे.

महाराष्ट्रात ‘शक्ती कायदा’ लागू करावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन !

महाराष्ट्रात शक्ती कायदा लागू करण्यात यावा, यासाठी ३ सप्टेंबर या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मंत्रालयाजवळील गांधीजींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.

सुतारवाडी (पुणे) येथील कब्रस्‍तानातील अवैध बांधकामावर महापालिकेची कारवाई !

अवैध मशीद बांधण्‍यात येईपर्यंत महापालिका झोपली होती का ? अशा अवैध मशिदींवर कारवाई होण्‍यासाठी लोकांना लढा का द्यावा लागतो ?

उंचगाव येथील राज्य महामार्गाच्या पुलाखाली पडलेल्या खड्ड्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निषेध !

सातारा ते कागल हे सहापदरीकरण करण्याचे काम अत्यंत संथगतीने चालू आहे. या मार्गावर मोठे खड्डे पडले असून येथे अनेकांचे अपघात झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून शिवसेनेला डावलून समित्यांच्या नियुक्त्या !

कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या प्रमुख निर्णयात शिवसेनेला डावलले जाते.