Sardar Akhtar Mengal of Pakistan : बलुचिस्तान प्रांत पाकच्या हातातून गेला आहे !

पूर्व बंगालचा बांगलादेश करण्यात भारताने साहाय्य केले, तसे आता बलुचिस्तानसाठी भारताने पावले उचलावीत, असे अनेक बलुची नेत्यांना वाटते !

पुष्कळ संवेदनशील सूत्र असल्याने यावर कुणीही विश्वास ठेवू नये ! – महापालिका आयुक्त

पिंपरी-चिंचवड येथे छत्रपती संभाजी महाराजांचा १०० फुटी पुतळा उभारला जात आहे; मात्र पुतळा उभारण्यापूर्वी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाला तडा गेला.

CM Siddaramaiah : अजानचा आवाज ऐकून कर्नाटकच्या काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाषण थांबवले !

ज्या मशिदीवरून अजानचा आवाज येत होता, तो किती डेसिबल होता ?, याची पडताळणीचा आदेश सिद्धरामय्या यांनी का दिला नाही ? त्या मशिदीवर भोंगा लावण्याची अनुमती घेतली होती का ?, याचीही चौकशी केली पाहिजे !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा नोंद !

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नवीन गुन्हा नोंद केला आहे.

एस्.टी.च्या संपामुळे सुमारे १५ कोटी रुपयांचा महसूल बुडला !

४ सप्टेंबरलाही राज्यभर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कोकणातील बसगाड्यांची वाहतूक रखडल्याने प्रवासी राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करीत आहेत. संपामुळे एस्.टी.चा १५ कोटी रुपयांचा महसूल बुडला आहे.

नागपूर येथील विमानतळावर ६१ लाख रुपयांचे सोने जप्त !

नागपूर येथील कस्टम्सच्या ‘एअर कस्टम्स युनिट’ आणि ‘एअर इंटेलिजन्स युनिट’च्या पथकाने संशयित प्रवाशांची पडताळणी केली असता २ ट्रॉली बॅगांमध्ये सोने आणि चांदी जाड तारांच्या स्वरूपात लपवून ठेवलेले आढळून आले.

पुणे शहरातील अयोग्य पद्धतीने दुकान मांडणार्‍या २२६ श्री गणेशमूर्ती विक्रेत्यांना नोटीस !

रस्त्यावर आणि पादचारी मार्गांवर श्री गणेशमूर्ती विक्रीची दुकाने मांडली जातात, त्यामुळे वाहतूककोंडी होते. अशा २२६ विक्रेत्यांना महापालिकेने नोटीस दिली आहे. यामध्ये सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाने सर्वाधिक ३४ नोटिसा दिल्या आहेत.

श्रीराम जन्मभूमीच्या आंदोलनामुळेच विश्व हिंदु परिषदेची जगात ओळख निर्माण झाली ! – ह.भ.प. भागवताचार्य माधवदास राठी महाराज

श्रीराम जन्मभूमीचे आंदोलन हे हिंदु अस्मितेचे आंदोलन होते. या आंदोलनामुळेच विश्व हिंदु परिषदेची जगात ओळख निर्माण झाली.

पडघा (ठाणे) येथून मुंबईत पोपट आणि घारी यांची तस्करी करणारी बस पकडली !

भिवंडीतील पडघा येथे मालेगावमधून क्रॉफर्ड मार्केटमध्ये नेण्यात येणारे ३० पोपट आणि ३ कापशी घारींची तस्करी करणारी पर्यटक बस ठाणे वन विभागाने पकडली. आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये एक चालक आणि एक साहाय्यक यांचा समावेश आहे.

गणेशोत्सवात प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या संकल्पना राबवू नयेत !

वर्ष २०२० मध्ये निपाणी नगरपालिकेने मूर्तीदान प्रकल्प राबवून जमा झालेल्या श्री गणेशाच्या मूर्ती कचर्‍याच्या गाडीतून नेऊन कचरा डेपोमध्ये ठेवल्या होत्या. यामुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्याने निपाणी येथील भाविकांनी मूर्तीदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देणे बंद केले आहे.