साधिका नामजप करत चारचाकी गाडीने जात असतांना झालेल्या भीषण अपघातात गुरुदेवांच्या कृपेने तिचे रक्षण होणे आणि तिच्या लक्षात आलेले नामजप करण्याचे महत्त्व !

१. साधिका सकाळी कार्यालयात जात असतांना तिच्या चारचाकी गाडीला मोठ्या ‘माझदा’ गाडीने धडक देणे : ‘२५.१२.२०१९ या दिवशी मी माझ्या चारचाकी गाडीने कार्यालयात जात होते. त्या वेळी मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत होते. अनुमाने सकाळी ७.३० वाजता पुणे येथील धायरी चौकात २५ आसनांच्या मोठ्या ‘माझदा’ गाडीने माझ्या चारचाकीला धडक दिली.

२. अपघाताच्या वेळी घडलेली घटना : त्यामुळे माझी गाडी चेपली गेली. माझी गाडी पुढच्या बाजूने वर उचलली गेली. मी गाडीमध्ये असतांना मागील एका चाकावर गाडी उभी राहिली आणि त्या चौकात गोलगोल फिरू लागली. माझा नामजप चालूच होता. त्यानंतर गाडी अकस्मात् थांबली आणि पुन्हा चार चाकांवर उभी राहिली.

३. भीषण अपघात होऊनही साधिका सुखरुप असल्याचे आणि तिची चारचाकीही व्यवस्थित चालू झाल्याचे पाहून तेथे असलेल्या लोकांना आश्चर्य वाटणे : त्या वेळी तेथे असलेले सर्व जण आणि ज्या गाडीने धडक दिली होती, त्याचा चालक धावत माझ्या गाडीजवळ आला. ‘मी सुखरूप आहे आणि मला साधा ओरखडाही आला नाही’, याचे तेथील सर्वांना पुष्कळ आश्चर्य वाटले. त्यानंतर माझी चारचाकीही व्यवस्थित चालू झाली.

४. मला या प्रसंगात कुठेही भीती वाटली नाही; कारण गुरुदेव माझे रक्षण करत होते. मला नामजपाचे अनन्यसाधारण महत्त्व समजले. श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. योगिता वीरेंद्र देशपांडे, धायरी, पुणे. (१०.२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक