सतारीवर ‘हंसध्वनी’ हा राग ऐकत असतांना कु. म्रिणालिनी देवघरे यांना जाणवलेली सूत्रे !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी २६.३.२०२२ या दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सतारीवर राग ‘हंसध्वनी’चे प्रत्यक्ष वादन केले. या वेळी श्री. योगेश सोवनी आणि श्री. गिरिजय प्रभुदेसाई या दोघांनी त्यांना तबल्यावर साथ केली. या रागाविषयी कु. म्रिणालिनी देवघरे यांनी केलेला अभ्यास आणि सतारीवर हा राग ऐकत असतांना त्यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

गायनसाधना

१. राग ‘हंसध्वनी’ची माहिती

श्री. मनोज सहस्रबुद्धे

१ अ. ‘वादी स्वर (टीप १) : सा

१ आ. संवादी स्वर (टीप २) :

१ इ. रागाच्या गायनाची वेळ : सायंकाळी ६ ते रात्री ९

टीप १ – वादी स्वर : रागातील प्रमुख स्वराला ‘वादी स्वर’, असे म्हणतात. वादी स्वराचा उपयोग रागात प्रामुख्याने आणि अधिक प्रमाणात केला जातो.

टीप २ – संवादी स्वर : रागातील दुसर्‍या प्रमुख स्वराला ‘संवादी स्वर’, असे म्हणतात. हा स्वर वादी स्वराच्या खालोखाल महत्त्वाचा असतो.

२. प.पू. देवबाबा यांच्या ‘शक्तिदर्शन योगाश्रम’ या मासिकात राग ‘हंसध्वनी’ची दिलेली माहिती

राग ‘हंसध्वनी’ हा कर्नाटक संगीत पद्धतीतून घेतलेला असून त्याने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये अप्रतिम प्रसिद्धी मिळवली आहे. कर्नाटक संगीत पद्धतीतील ‘हंसध्वनी’ हा राग ख्यातनाम मुत्थुस्वामी दिक्षीतर यांचे वडील श्री. रामस्वामी दिक्षीतर यांनी बनवला आहे. असे म्हटले जाते की, या रागाला ‘भेंडी बाजार’ घराण्याच्या अमन अली खान यांनी हिंदुस्थानी संगीतात आणले. या रागात ‘म’ आणि ‘ध’ हे स्वर वर्ज्य (टीप ३) आहेत अन् बाकी स्वर शुद्ध (टीप ४) आहेत. हा राग ऊर्जा प्रदान करणारा आहे. हा राग ऐकणार्‍या, वाजवणार्‍या आणि गाणार्‍या व्यक्तीमध्ये जीवनशक्ती निर्माण करतो. हा राग शांतता, प्रसन्नता आणि सकारात्मकता निर्माण करतो; म्हणून त्याला ‘सर्वरोगहारिणी’, हे योग्य नाव दिले आहे.

टीप ३ – वर्ज्य स्वर : जे स्वर रागात येत नाहीत, त्यांना ‘वर्ज्य स्वर’ अथवा ‘विवादी स्वर’, असे म्हणतात.

टीप ४ – शुद्ध स्वर : जेव्हा स्वर आपल्या मूळ जागेवरच असतात, तेव्हा त्यांना ‘शुद्ध स्वर’, असे म्हणतात.

३. संकेतस्थळावर (वेबसाईटवर) दिलेली राग ‘हंसध्वनी’ची माहिती

अ. ‘हंसध्वनी’ हा राग मूलाधारचक्र हे ऊर्जाकेंद्र सक्रीय करण्यासाठी ओळखला जातो. हा राग मनाचा निष्पापपणा आणि तल्लख बुद्धीमत्ता यांना उद्दिपित करतो. हा राग ‘हृदयरोग, चिंताग्रस्तता, चिडचिड, मज्जातंतूचा विकार (‘न्यूरोसिस’)’, यांवर उपचार म्हणून वापरला जातो. हा राग मूतखडा-निर्मिती, जळजळ, निद्रानाश आणि चिंता हे सर्व टाळण्यासही साहाय्य करतो. हा मधुमेहाच्या नियंत्रणासाठीसुद्धा उपयुक्त आहे आणि थोडी डोकेदुखी, निद्रानाश अन् ‘सायनस’, या समस्या दूर करण्यासाठी या रागामुळे साहाय्य होते.

आ. ‘हंसध्वनी’ हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. संथ जलाशयात विहार करणार्‍या शांत हंसांचा आवाज आणि विहार यांच्याशी संलग्न (साधर्म्य दर्शवणारा), असा हा राग आहे.

४. सतारीवर राग ‘हंसध्वनी’ ऐकत असतांना जाणवलेली सूत्रे

कु. म्रिणालिनी देवघरे

अ. हा राग ऐकतांना एखाद्या उत्सवाप्रमाणे वातावरण निर्माण झाले होते.

आ. ‘सर्वत्र आनंदाची स्पंदने पसरली आहेत’, असे मला जाणवले. ती आनंदाची स्पंदने माझ्या अनाहतचक्रावरही जाणवत होती.

इ. ‘या रागावर उत्स्फूर्त नृत्य करावे’, असे मला वाटले आणि मी ते प्रत्यक्ष करूनही पाहिले. तेव्हा नृत्य करतांनाही माझ्या मनाची निर्विचार स्थिती होती.

ई. हा राग ऐकतांना मी उत्स्फूर्तपणे एक चित्र रेखाटले.’

सतारीवर ‘हंसध्वनी’ राग ऐकतांना कु. म्रिणालिनी देवघरे यांनी उत्स्फूर्तपणे रेखाटलेले चित्र


‘कु. म्रिणालिनी देवघरे यांनी सतारीवर राग ‘हंसध्वनी’ ऐकत असतांना रेखाटलेले वरील चित्र पाहिल्यावर मला त्या चित्रात आनंदाची स्पंदने जाणवली.’ – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (८.८.२०२४)