US Lauds India Elections : अमेरिकेने केले भारतीय निवडणूक प्रक्रियेचे कौतुक !

अमेरिका कोणत्‍याही देशाचे स्‍वार्थापोटीच कौतुक करते किंवा त्‍याच्‍यावर टीका करते, हे लक्षात घेता अमेरिकेच्‍या प्रत्‍येक कृतीकडे सतर्कतेनेच पहाण्‍याची आवश्‍यकता आहे !

India Slams Pakistan : पाकिस्‍तानने संयुक्‍त राष्‍ट्रांमध्‍ये काश्‍मीरचे सूत्र उपस्‍थित केल्‍यावर भारताने पुन्‍हा फटकारले !

संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या सुरक्षा परिषदेत चर्चेच्‍या वेळी भारताचे प्रतिनिधी आर्. रवींद्र यांनी सांगितले की, युनियन प्रांत जम्‍मू-काश्‍मीर आणि लडाख हे अविभाज्‍य आणि भारतातील वेगवेगळे भाग आहेत.

Sam Pitroda : भारतियांवर टीका करणारे सॅम पित्रोदा यांची पुन्‍हा ‘इंडियन ओव्‍हरसीज काँग्रेस’च्‍या अध्‍यक्षपदी निवड

यातून काँग्रेस भारतियांना तुच्‍छ लेखते. पित्रोदांना हटवणे ही तोंडदेखली कारवाई होती, हे स्‍पष्‍ट होते. काँग्रेसला मते देणार्‍या हिंदूंना हे मान्‍य आहे का ?

Amartya Sen : (म्‍हणे) ‘भारताला हिंदु राष्‍ट्र बनवण्‍याची कल्‍पना योग्‍य नाही !’ – अर्थतज्ञ अमर्त्‍य सेन

हिंदु राष्‍ट्र बनवण्‍याची कल्‍पना अशा लोकांना कधीच आवडणार नाही; कारण ते केवळ जन्‍महिंदू असून त्‍यांना हिंदु धर्मच ठाऊक नाही !

Odisha Rape Case : ६ वर्षांच्‍या मुलीवर बलात्‍कार करणार्‍या दोन जणांपैकी एकाची फाशी रहित, तर दुसर्‍याला जन्‍मठेप !

‘बलात्‍कार्‍याला कनिष्‍ठ न्‍यायालय फाशीची शिक्षा सुनावते आणि उच्‍च न्‍यायालय रहित करते, हे कसे ?’, असा प्रश्‍न सामान्‍य जनतेच्‍या मनात येणे साहजिक आहे !

हिंदु राष्‍ट्र बनवण्‍यासाठी मोठे जनआंदोलन उभारणे आवश्‍यक ! – प्रवीण चतुर्वेदी, संस्‍थापक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी, ‘प्राच्‍यम’

आज संपूर्ण जग हिंदु धर्म आणि संस्‍कृती यांना नष्‍ट करण्‍याचा प्रयत्न करत आहे. त्‍यामुळे आपल्‍याला संघटित होऊन त्‍याचा सामना करावा लागेल. हिंदु राष्‍ट्र बनण्‍यासाठी धार्मिकता आणि आध्‍यात्मिकता यांचे मिश्रण असलेले एक मोठे जनआंदोलन उभे करणे आवश्‍यक आहे. तेच हिंदु जनजागृती समिती या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या माध्‍यमातून करत आहे.

अश्‍लीलता पसरवून समाजावर आघात करणार्‍यांवर बलात्‍काराचा गुन्‍हा नोंदवायला हवा ! – उदय माहुरकर, संस्‍थापक, सेव्‍ह कल्‍चर सेव्‍ह भारत फाऊंडेशन, देहली

‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म्‍स’वर व्‍यभिचार दाखवणार्‍यांची जागा कारागृहात असायला हवी. हे रोखण्‍यासाठी आम्‍ही योजना निश्‍चित करत आहोत. अश्‍लीलता पसरवून समाजावर आघात करणार्‍यांवर बलात्‍काराचा गुन्‍हा नोंदवायला हवा. अशांना ३ वर्षांपर्यंत जामीन मिळू नये.  संस्‍कृतीवरील हे आक्रमण राष्‍ट्रद्रोह मानला जावा, असा कडक कायदा या विरोधात असणे अपेक्षित आहे.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा चौथा दिवस (२७ जून) उद़्‍बोधन सत्र – ओटीटी आणि हिंदी चित्रपटसृष्‍टी

भारतावर आक्रमण करणार्‍यांनी जेवढी देशाची हानी केली नाही, तेवढी हानी ‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म्‍स’वरील व्‍यभिचारी व्‍हिडिओंच्या माध्‍यमातून झाली आहे. ८० टक्‍के बलात्‍कार अशा प्रकारचे व्‍हिडिओ पाहून होत आहेत !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाचा चौथा दिवस (२७ जून) : हिंदु राष्‍ट्रसाठी वैचारिक आंदोलन

सद्य:स्‍थितीत विषयाचा प्रॉपगंडा (प्रचार) करून राष्‍ट्र आणि हिंदु धर्म यांच्‍या विरोधात ‘नॅरेटिव्‍ह’ (कथानक) पसरवले जात आहेत. यामागे राष्‍ट्रविरोधी शक्‍ती कार्यरत आहेत.