Odisha Rape Case : ६ वर्षांच्‍या मुलीवर बलात्‍कार करणार्‍या दोन जणांपैकी एकाची फाशी रहित, तर दुसर्‍याला जन्‍मठेप !

  • ओडिशा उच्‍च न्‍यायालयाचा निर्णय

  • कनिष्‍ठ न्‍यायालयाने सुनावली होती दोघांना फाशीची शिक्षा !

ओडिशा उच्‍च न्‍यायालया

भुवनेश्‍वर (ओडिशा) – ६ वर्षांच्‍या मुलीवर सामूहिक बलात्‍कार प्रकरणात ओडिशा उच्‍च न्‍यायालयाने अकील अली आणि आसिफ अली यांची फाशीची शिक्षा रहित केली. आरोपींना कनिष्‍ठ न्‍यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती; पण ओडिशा उच्‍च न्‍यायालयाने अकिल अली याची निर्दोष मुक्‍तता केली आणि आसिफ अली याची फाशीची शिक्षा जन्‍मठेपेत पालटली. ‘आरोपी दिवसातून अनेक वेळा नमाजपठण करतो आणि त्‍याने स्‍वतःला अल्लाला समर्पित केले असल्‍याने तो कोणत्‍याही शिक्षेला सामोरे जाण्‍यास सिद्ध आहे ’, असे या वेळी न्‍यायालयाने म्‍हटले.

अकील आणि आसिफ यांनी २१ ऑगस्‍ट २०१४ या दिवशी चॉकलेट खरेदी करण्‍यासाठी गेलेल्‍या ६ वर्षीय मुलीचे अपहरण केले आणि नंतर ती नग्‍नावस्‍थेत आणि बेशुद्ध अवस्‍थेत सापडली होती. रुग्‍णालयात नेत असतांना वाटेतच तिचा मृत्‍यू झाला.

संपादकीय भूमिका

‘बलात्‍कार्‍याला कनिष्‍ठ न्‍यायालय फाशीची शिक्षा सुनावते आणि उच्‍च न्‍यायालय रहित करते, हे कसे ?’, असा प्रश्‍न सामान्‍य जनतेच्‍या मनात येणे साहजिक आहे !