Amartya Sen : (म्‍हणे) ‘भारताला हिंदु राष्‍ट्र बनवण्‍याची कल्‍पना योग्‍य नाही !’ – अर्थतज्ञ अमर्त्‍य सेन

नोबेेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ अमर्त्‍य सेन यांचे विधान !

अर्थतज्ञ अमर्त्‍य सेन

नवी देहली – भारताला हिंदु राष्‍ट्र बनवण्‍याची कल्‍पना मला योग्‍य वाटत नाही. भारत हे हिंदु राष्‍ट्र नाही, हे लोकसभा निवडणुकीच्‍या निकालातून स्‍पष्‍ट झाले आहे, असे विधान अर्थतज्ञ आणि नोबेल पुरस्‍कार विजेते अमर्त्‍य सेन यांनी केले आहे.

‘भारतासारख्‍या धर्मनिरपेक्ष देशात एक सर्वसमावेशक राज्‍यघटना असतांना आपल्‍या पुढार्‍यांनी राजकीय उदारमतवाद दाखवायला हवा’, अशीही अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. ते प्रसारमाध्‍यमांशी बोलत होते.

अमर्त्‍य सेन पुढे म्‍हणाले की, श्रीराममंदिर उभारण्‍यावर बराच पैसा खर्च करण्‍यात आला. यातून भारत हे हिंदु राष्‍ट्र आहे, हे दाखवण्‍याचा प्रयत्न झाला. म. गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्‍या काळातही असा प्रयत्न कधी झाला नाही. भारताची खरी ओळख झाकण्‍याचा हा प्रयत्न होता, त्‍यात पालट झाला पाहिजे. प्रत्‍येक निवडणुकीनंतर काहीतरी पालट होईल, अशी अपेक्षा आपण ठेवतो. गेल्‍या काही निवडणुकांनंतर देशात काय झाले, हे आपण पाहिले. काही नेत्‍यांना कायदेशीर प्रक्रियेखेरीज कारागृहात टाकले जात आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्‍यातील दरी वाढत चालली आहे. हे सर्व थांबायला हवे.

संपादकीय भूमिका

  • भारताला इस्‍लामी राष्‍ट्र बनवण्‍याचा प्रयत्न जिहादी आतंकवादी संघटना आणि धर्मांध मुसलमान करत आहेत, त्‍याविषयी अमर्त्‍य सेन यांच्‍यासारखे पुरो(अधो)गामी कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्‍या !
  • हिंदु राष्‍ट्र बनवण्‍याची कल्‍पना अशा लोकांना कधीच आवडणार नाही; कारण ते केवळ जन्‍महिंदू असून त्‍यांना हिंदु धर्मच ठाऊक नाही !