Bangladesh Violence : हिंदु आणि बौद्ध यांची २०० घरे आणि दुकाने जाळली : ३ जणांचा मृत्‍यू

बांगलादेशात पुन्‍हा अल्‍पसंख्‍यांकांवर आक्रमण

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात अल्‍पसंख्‍यांकांवर होणारी आक्रमणे थांबलेली नाहीत. १९ सप्‍टेंबरला धर्मांध मुसलमानांनी चितगाव येथील दिघिनाला आणि खगराचरी सदर या भागांमध्‍ये हिंदु आणि बौद्ध यांच्‍यावर आक्रमण केले. यात २०० हून अधिक घरे आणि दुकाने जाळण्‍यात आली. तसेच एका बौद्ध मंदिराची हानी करण्‍यात आली. या हिंसाचारात ३ जणांचा मृत्‍यू झाला आहे.

१८ सप्‍टेंबरला खागराचरी भागात महंमद मामून नावाच्‍या गुन्‍हेगाराची हत्‍या करण्‍यात आल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. मामून दुचाकी चोरण्‍याचा प्रयत्न करत असतांना ही हत्‍या झाली. यानंतर आदिवासींनी बंगालींवर आक्रमण करून एका व्‍यक्‍तीची हत्‍या केल्‍याची अफवा पसरवण्‍यात आली होती. ही अफवा पसरवण्‍यासाठी मशिदींचाही अपवापर करण्‍यात आला. मामून याच्‍या मृत्‍यूच्‍या निषेधार्थ ‘बंगाली छात्र परिषद’ नावाच्‍या संघटनेने १९ सप्‍टेंबरला मोर्चा काढला. यात सहभागी झालेल्‍या लोकांनी बौद्ध चकमा आणि हिंदु त्रिपुरी समाजातील लोकांवर आक्रमण केले. त्‍यांची घरे आणि दुकाने यांना लक्ष्य करण्‍यात आले. लहान मुले, वृद्ध, महिला यांना मारहाण करण्‍यात आली. या हिंसाचारात २० वर्षीय जुनन चकमा, ६० वर्षीय धनंजय आणि ३० वर्षीय रुबेल त्रिपुरा यांचा मृत्‍यू झाला. यापेक्षा कितीतरी अधिक लोकांचा मृत्‍यू झाल्‍याचा दावा स्‍थानिक रहिवाशांनी केला आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात यापूर्वीही हेच घडत होते, आताही घडत आहे आणि पुढेही घडत रहाणार आहे ! भविष्‍यात ही स्‍थिती भारतात निर्माण झाल्‍यास आश्‍चर्य वाटू नये !