नवी देहली – सॅम पित्रोदा यांची पुन्हा एकदा ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. काँग्रेसचे नेते के.सी. वेणूगोपाल यांनी परिपत्रक प्रसारित करून ही माहिती दिली. भारतियांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे त्यांना या पदावरून काही मासांपूर्वीच हटवण्यात आले होते. काँग्रेसच्या या निर्णयानंतर भाजपचे नेते अमित मालविय यांनी काँग्रेसवर टीका करतांना म्हटले की, मध्यमवर्गीयांना त्रास देणारा परत आला असून काँग्रेसने देशवासियांचा विश्वासघात केला आहे.
काय म्हणाले होते सॅम पित्रोदा ?
सॅम पित्रोदा यांनी ‘द स्टेट्समन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारताच्या लोकशाहीविषयी बोलतांना म्हटले की, भारतात एका बाजूला ईशान्येकडील लोक चिनी नागरिकांसारखे दिसतात, पश्चिमेकडचे लोक अरबांसारखी दिसतात, तर उत्तर भारतातील लोक कदाचित् गोर्या पाश्चात्त्य लोकांसारखे आणि दक्षिणेतील लोक आफ्रिकी नागरिकांसारखे दिसतात. तरीही त्याचा आपल्या जगण्यावर काहीही परिणाम झालेले नाही. आपण सर्वच बंधू आणि भगिनींप्रमाणे एकत्र नांदत वैविध्यपूर्ण देश एकत्र ठेवू शकलो.
संपादकीय भूमिकायातून काँग्रेस भारतियांना तुच्छ लेखते. पित्रोदांना हटवणे ही तोंडदेखली कारवाई होती, हे स्पष्ट होते. काँग्रेसला मते देणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ? |