Lal Krishna Advani : माजी उपपंतप्रधान लालकृष्‍ण अडवाणी रुग्‍णालयात भरती

भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणी

नवी देहली – माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणी (वय ९६ वर्षे) यांची प्रकृती खालावल्‍यामुळे त्‍यांना येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्‍थेत (एम्‍समध्‍ये) उपचारासाठी भरती करण्‍यात आले आहे. ३ मासांपूर्वीच अडवाणी यांना भारतरत्न पुरस्‍कार देण्‍यात आला आहे.