US Lauds India Elections : अमेरिकेने केले भारतीय निवडणूक प्रक्रियेचे कौतुक !

वॉशिंग्‍टन (अमेरिका) – अमेरिकेने पुन्‍हा एकदा भारताच्‍या लोकसभा निवडणुकीचे कौतुक केले. राज्‍य विभागाचे प्रवक्‍ते मॅथ्‍यू मिलर यांनी सांगितले की, जेव्‍हा भारताच्‍या निवडणुकीचा विचार केला जातो, तेव्‍हा आम्‍ही अमेरिका सरकारच्‍या वतीने हे स्‍पष्‍ट करू इच्‍छितो की, भारतातील निवडणूक म्‍हणजे जगाच्‍या इतिहासातील लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्‍सव साजरा झाला. ही एक विलक्षण कामगिरी होती.

संपादकीय भूमिका

अमेरिका कोणत्‍याही देशाचे स्‍वार्थापोटीच कौतुक करते किंवा त्‍याच्‍यावर टीका करते, हे लक्षात घेता अमेरिकेच्‍या प्रत्‍येक कृतीकडे सतर्कतेनेच पहाण्‍याची आवश्‍यकता आहे !