India Slams Pakistan : पाकिस्‍तानने संयुक्‍त राष्‍ट्रांमध्‍ये काश्‍मीरचे सूत्र उपस्‍थित केल्‍यावर भारताने पुन्‍हा फटकारले !

भारताचे प्रतिनिधी आर्. रवींद्र

न्‍यूयॉर्क (अमेरिका) – पाकिस्‍ताने पुन्‍हा एकदा संयुक्‍त राष्‍ट्रांत काश्‍मीरचे सूत्र उपस्‍थित केले आणि भारतानेही पुन्‍हा एकदा पाकिस्‍ताला सुनावले. संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या सुरक्षा परिषदेत चर्चेच्‍या वेळी भारताचे प्रतिनिधी आर्. रवींद्र यांनी सांगितले की, युनियन प्रांत जम्‍मू-काश्‍मीर आणि लडाख हे अविभाज्‍य आणि भारतातील वेगवेगळे भाग आहेत.

संपादकीय भूमिका

संयुक्‍त राष्‍ट्रांत गेली अनेक दशके पाकिस्‍तान काश्‍मीरचे सूत्र उपस्‍थित करतो आणि भारत त्‍याला फटकारतो; मात्र असे असतांना पाकवर त्‍याचा काहीच परिणाम होत नाही. पाकला शब्‍दांची नाही, तर शस्‍त्रांचीच भाषा समजते आणि त्‍या भाषेत भारताने त्‍याला उत्तर दिले पाहिजे !