चीनमधील ५२ वर्षीय महिला राज्यपालाला १३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

  • महिला राज्यपालाचे ५८ पुरुषांशी होते लैंगिक संबंध

  • ७१ कोटी रुपयांची लाचही स्वीकारली

राज्यपाल झोंग यांग

बीजिंग (चीन) – चीनच्या गुइझोऊ प्रांताच्या राज्यपाल असलेल्या ५२ वर्षीय झोंग यांग यांना १३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच १ लाख ४० सहस्र डॉलरचा (८३ लाख ४७ सहस्र रुपयांचा) दंडही ठोठावण्यात आला आहे. या महिलेचे तिच्याच कार्यालयातील ५८ पुरुषांशी लैंगिक संबंध असल्याचे समोर आले होते. तसेच तिने ७१ कोटी रुपयांची लाचही स्वीकारली होती. त्या ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीन’च्या सदस्य होत्या.

चीनमधील ‘नेटइज न्यूज’शी बोलतांना एका अधिकार्‍याने सांगितले की, झोंग यांगकडून लाभ मिळावा, यासाठी अनेक पुरुष तिचा प्रियकर होणे पसंत करत असत; मात्र काही पुरुषांनी तिच्या धाकाला घाबरून अनिच्छेने लैंगिक संबंध ठेवले.