
पंढरपूर, २१ सप्टेंबर (वार्ता.) – ‘पेशवा युवा मंचा’च्या वतीने हिंदवी साम्राज्य विस्तारक श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची ३२३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील रुक्मिणी पटांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ह.भ.प. उद्धव कुकुरमुंडेकर महाराज यांच्या शुभहस्ते आणि मंचाचे आधारस्तंभ श्री. महेशकाका टोणपे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिमा पूजनानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी पेशवा युवा मंचाचे अध्यक्ष श्री. अभिजित पुराणिक, सर्वश्री गणेश लंके, ओंकार कुलकर्णी, ज्ञानराज बेणारे, निखिल कुलकर्णी, गोपाळ बडवे, किशोर गलगलकर, आनंद रानरुई, अनिकेत बडवे, बाळासाहेब डिंगरे, समिहन पाठक, शंतनू उत्पात, श्रीराम बडवे, रोहन उत्पात, तुकाराम चिंचणीकर, मानस परिचारक, हरिभाऊ उत्पात यांसह अन्य उपस्थित होते.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथे ‘अभिवादन रॅली’ पार पडली !
बाजीराव पेशवे यांचे नाव पुणे विमानतळाला द्यावे !
थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे ४ जुलैला अनावरण !
…हे आहे महाराष्ट्राचे पुरोगामित्व आणि भारताचे निधर्मीपण !
पुणे रेल्वेस्थानकाला ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ असे नाव द्या !
पहिल्या बाजीरावांनी छत्रसालाकडून मिळवलेले राज्य आणि मराठ्यांनी पानिपतच्या युद्धानंतर काढलेला वचपा !