Protected Forest For Tamnar Project : गोव्यातील तमनार प्रकल्पासाठी धारबांदोडा येथील १७ हेक्टर भूमी संरक्षित वनक्षेत्र म्हणून अधिूसचित

तमनार वीजवाहिनी प्रकल्पासाठी गोव्यातील ७८.२९७ हेक्टर भूमी वापरण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर झाडे लावून पर्यावरणाची होणारी हानी भरून काढण्यासाठी राज्याच्या वन खात्याने सांगोड, धारबांदोडा येथे १७.२२८ हेक्टर भूमी संरक्षित वनक्षेत्र म्हणून अधिूसचित केले आहे.

सिंधुदुर्ग : वन्य प्राण्यांसाठी सावंतवाडी वन विभागाने ३५ ठिकाणी निर्माण केले पाणवठे !

मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, डोंगर सपाटीकरण यांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. याचा परिणाम वन्य प्राण्यांना खाद्यासह मुख्यत्वेकरून पाणी मिळण्यावर होत आहे.

जगातील पहिल्या ‘हिंदु ओटीटी प्लॅटफॉर्म -‘प्राच्यम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण चतुर्वेदी यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट !

श्री. चतुर्वेदी हे त्यांच्या कुटुंबियांसह येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट देण्यास आले होते. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी चतुर्वेदी कुटुंबियांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या राष्ट्र-धर्म कार्याविषयी विविधांगी माहिती दिली.

Goa OCI Card Issue : प्रवासी भारतीय नागरिकत्व कार्डचा प्रश्न पुन्हा चर्चेत !

मुंबई उच्च न्यायालयाने ‘ओ.सी.आय.’ कार्डसंबंधी परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनाच्या आधारावर दोन्ही याचिका निकाली काढल्या होत्या; मात्र आता परराष्ट्र मंत्रालयाच्या नवीन शुद्धीपत्रामुळे ‘ओ.सी.आय.’ कार्डसंबंधी अनेक प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आहेत !

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याच्या प्रस्तावाला नरेंद्र मोदी यांनी होकार दिला ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मुख्यमंत्रीपदाचे दायित्व एकनाथ शिंदे समर्थपणे सांभाळत आहेत. उद्धव ठाकरे काँग्रेससमवेत जातील, असे कधीच वाटले नव्हते. अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्याचा शब्द आम्ही त्यांना कधीही दिला नव्हता.

महाविकास आघाडीला मत म्हणजे पाकिस्तानला मत देण्यासारखे ! – नवनीत राणा, खासदार

काँग्रेस निवडून यावी, असे पाकिस्तानला वाटते. त्यामुळे महाविकास आघाडीला मत म्हणजे पाकिस्तानला मत देण्यासारखे आहे, असे प्रतिपादन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केले.

सरकता जिना अचानक उलटा फिरल्याने प्रवाशांचा गोंधळ !

दिवा स्थानकावरील सरकता जिना अचानक उलटा फिरला. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. आधी तो विजेअभावी बंद होता. वीज आल्यावर जिना वर जाण्याऐवजी मागे जाऊ लागला.

शाळकरी मुलांच्या अपहरणाच्या गैरसमजातून दोघा भिक्षुकांना जमावाकडून मारहाण !

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हे संशयित तरुण भिक्षुक असून कुटुंबियांसह त्यांचे मिरज येथील कृपामयी रुग्णालयाजवळील झोपडपट्टीत वास्तव्य असल्याचे समोर आले.

छत्रपती संभाजीनगर येथे अभियांत्रिकी तरुणी घरातून चालवत होती गर्भलिंग निदान केंद्र !

आजच्या तरुणांची फसवेगिरी ! अशांना कठोर शिक्षाच हवी !