राज्यसभेत केंद्रीय मंत्री तोखन साहू यांनी दिली माहिती
पणजी, १० मार्च (वार्ता.) – ‘पणजी स्मार्ट सिटी’ने आतापर्यंत एकूण १ सहस्र ५१ कोटी रुपये किमतीचे ५१ प्रकल्प हाती घेतले आहेत आणि यामधील ८४९ कोटी रुपये किमतीचे ४२ प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, तर २०२ कोटी रुपये किमतीच्या उर्वरित ९ प्रकल्पांची कामे चालू आहेत. ही माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री तोखन साहू यांनी राज्यसभेत भाजपचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी विचारलेल्या एका प्रश्नावरील उत्तरात दिली.
यात त्यांनी पुढे म्हटले आहे की, ४ मार्च २०२५ पर्यंत ‘पणजी स्मार्ट सिटी’ला ‘स्मार्ट सिटी मिशन’ योजनेच्या अंतर्गत ४४१ कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य मिळाले आहे आणि यामधील ४११ कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत.’’ ‘पणजी स्मार्ट सिटी’ची सर्व कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२५ हा अंतिम दिनांक आहे.