मटणातील भेसळ रोखण्यासाठी ‘मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम’या संकेतस्थळाचे उद्घाटन !

हिंदु खाटिका महासंघाच्या ‘मल्हार सर्टिफिकेशन’च्या संकेतस्थळाचे उद्घाटन करतांना मंत्री नितेश राणे

मुंबई – मटणातील भेसळ रोखण्यासाठी महाराष्ट्रातील हिंदु समाजाच्या दृष्टीने ‘मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले असून ‘मल्हार सर्टिफिकेशन झटका मटण’ ही नवीन संकल्पना पुढे आणली आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची हिंदु खाटिक महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्या वेळी महासंघाच्या ‘मल्हार सर्टिफिकेशन’च्या संकेतस्थळाचे मंत्री नितेश राणे यांनी उद्घाटन केले. ‘यापुढे मटणातील भेसळ रोखण्यासाठी राज्यात हिंदूंची मटण दुकाने चालू करण्यात येणार आहेत’, असे हिंदु खाटिक महासंघाने सांगितले.

या संदर्भात महासंघाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या दुकानांमध्ये १०० टक्के हिंदु समाजाचे प्राबल्य असल्याने त्यात भेसळ नसेल. या संदर्भात मंत्री नितेश राणे यांनी ‘या झटका मटण ‘मल्हार सर्टिफिकेशन’चा वापर हिंदूंनी अधिकाधिक करावा; किंबहुना ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल, तेथे हिंदु समाजाने मटण खरेदी करू नये’, असे आवाहन केले.

या वेळी https://www.malharcertification.com/ या संकेतस्थळाचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी महासंघाचे सदस्य आकाश पलंगे, आदेश नकाते, प्रवीण साबळे उपस्थित होते.

हलाल आणि झटका मांस यांतील भेद !

हलाल मांस म्हणजे प्राण्यांचे तोंड मक्केच्या दिशेला करून त्यांच्या गळ्याची नस चिरली जाते आणि त्यांना तडफडत मरू दिले जाते. त्यात प्राण्यांचे रक्त मोठ्या प्रमाणात वहाते. याउलट हिंदु किंवा शीख धर्मांमध्ये ‘झटका’ पद्धतीने प्राण्यांची हत्या केली जाते. त्यात प्राण्यांची मान एकाच घावात कापली जात असल्याने त्यांना अल्प प्रमाणात त्रास होतो.

संपादकीय भूमिका

‘हलाल’ जिहाद करणार्‍यांना सडेतोड प्रत्युत्तर !