
वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘टेस्ला’ आणि ‘स्टारलिंक’ या आस्थापनांचे प्रमुख आणि ‘डीओजीई’चे (अमेरिकी सरकारची परिणामकारकता वाढवणार्या विभागाचे) संचालक इलॉन मस्क यांनी युक्रेनचे इंटरनेट बंद करण्याची धमकी दिली. मस्क म्हणाले की, जर युक्रेनमधील ‘स्टारलिंक’ प्रणाली बंद केली, तर युक्रेनची संरक्षणव्यवस्था कोलमडेल. मस्क यांची ‘स्टारलिंक इंटरनेट प्रणाली’ युक्रेनला सैनिकी संपर्क राखण्यासाठी उपयुक्त ठरली आहे.
१. मस्क यांनी ‘एक्स’वरून लिहिले की, स्टारलिंक प्रणाली ही युक्रेनियन सैन्याचा कणा आहे. मी युद्ध आणि लोकांचे मृत्यू यांमुळे त्रस्त आहे.
२. स्टारलिंक ‘लो-अर्थ ऑर्बिट’मध्ये उपग्रहांचे जागतिक नेटवर्क चालवते आणि अनेक देशांमध्ये अवकाश-आधारित इंटरनेट सुविधा प्रदान करते.
३. याआधीच अमेरिकेचे युक्रेनला मिळणारे ८ सहस्र ७०० कोटी रुपयांचे सैनिकी साहाय्य थांबवण्यात आले आहे. अमेरिकेच्या साहाय्य थांबवण्याच्या निर्णयावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. व्हाईट हाऊसच्या एका अधिकार्याने सांगितले की, झेलेंस्की यांच्या वाईट वर्तनामुळेच हा निर्णय घेण्यात आला. जर झेलेंस्की यांनी युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित् ही बंदी उठवता येईल.