‘PM Kisan List. APK’ या लिंकचा वापर न करण्याचे शेतकर्‍यांना आवाहन

प्रतिकात्मक छायाचित्र

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम्. किसान योजना) कृषी विभागाद्वारे राबवण्यात येते. या योजनेच्या अंतर्गत शेतकर्‍यांच्या भ्रमणभाषवर ‘PM Kisan List. APK’ किंवा  ‘Pm Kisan APK’ या लिंकचा संदेश येतो. ही लिंक उघडताच शेतकर्‍यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम काढली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी भ्रमणभाषवर उपरोक्त लिंकचा संदेश आला, तर ती लिंक उघडू नये किंवा तिचा वापर करू नये. अशी घटना घडल्यास किंवा आढळून आल्यास त्वरित जवळच्या संबंधित सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.