
गांधीनगर (गुजरात) – येथील दहेगाममध्ये देशभक्त हिंदु चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंमित सामन्यात भारताने विजय मिळवल्यावर त्याचा आनंद साजरा करतांना मिरवणूक काढली. ‘भारतमाता की जय’च्या घोषणा देत ही मिरवणूक येथील बडी मशीद भागात पोचल्यावर मुसलमानांनी तिच्यावर दगडफेक केली. यात काही वाहनांची हानी झाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून काही मुसलमानांना अटक केली आहे. ही घटना ९ मार्चच्या रात्री घडली. दगडफेकीत ३ हिंदु घायाळ झाले आहेत.
पोलिसांनी महंमद, अरबाज खान, ओवैस, साजिद हुसेन, वसीम, महंमद तौफिक, महंमद इरफान आणि नासिर खान यांच्यासह ६ अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ‘तुम्ही इथे का आला आहात?’ असे म्हणत मुसलमानांनी हिंदूंवर हे आक्रमण केले, तसेच शिवीगाळही केली.
संपादकीय भूमिका
|