दिव्यातील रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार !
प्रवासी एकमेकांवर आपटले
दिवा (जिल्हा ठाणे) – दिवा स्थानकावरील सरकता जिना अचानक उलटा फिरला. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. आधी तो विजेअभावी बंद होता. वीज आल्यावर जिना वर जाण्याऐवजी मागे जाऊ लागला. सरकता जिना वर जाण्याऐवजी खालच्या दिशेने जाऊ लागल्याने प्रवासी एकमेकांवर आपटले. सरकता जिना उलट जात असतांना चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती; मात्र काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत जिना थांबवण्यासाठी असलेले आपत्कालीन बटण दाबले. परिणामी जिना त्वरित थांबला. हा जिना फलाट १ आणि २ यांच्या मधील पुलाला जोडलेला आहे. अन्य वेळीही हा जिना किमान २ – ३ वेळा बंद पडतो.