मॉस्को-गोवा विमानात बाँबची अफवा !

‘गोवा एअर ट्रॅफिक कंट्रोल’ला ‘ई मेल’द्वारे विमानात बाँब असल्याची माहिती देण्यात आली होती; मात्र हा ‘ई मेल’ कुणी आणि का पाठवला ? हे अद्याप कळू शकले नाही.

जैन पंथियांचे श्रद्धास्थान सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करा ! – उमेश गांधी, हिंदु महासभा

सरकारच्या या निर्णयामुळे अहिंसावादी जैन पंथियांना संपूर्ण भारतामध्ये मोर्चे काढून निषेध आंदोलने करावी लागली. त्यामुळे केवळ जैन पंथियांच्याच नव्हे, तर कोणत्याही धार्मिक स्थळांचे महत्त्व जाणून घेऊन सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे.

सुखाची विचारधारा जगाची एक आणि भारताची वेगळी आहे ! – प.पू. सरसंघचालक मोहन भागवत

सरस्‍वतीदेवी आहे कि नाही ? हा प्रश्‍न सध्‍या उपस्‍थित केला जातो; पण जग विश्‍वासावर चालते. मनुष्‍य हा एकमेव प्राणी असा आहे की, जो स्‍वतः विश्‍वास ठेवतो आणि दुसर्‍यांना विश्‍वास ठेवायला लावतो. श्रद्धा ठेवतोही आणि ती ठेवायलाही लावू शकतो.

भारतातील मुंबई आणि भाग्‍यनगर ही दोन शहरे वृक्षारोपणात अव्‍वल !

शहरात असलेल्‍या चिमण्‍यांची संख्‍या, बायोडायव्‍हरसिटी, ट्री बोर्ड आणि बजेट या सर्वेक्षणात पडताळण्‍यात आले. यात देशातील मुंबई आणि भाग्‍यनगर ही दोन शहरे अव्‍वल ठरली.

नागपूर येथे विवाहितेशी अश्‍लील संभाषण करणार्‍या पर्यवेक्षकाला पोलिसांसमोरच मारहाण !

जिल्‍ह्यातील मौदा तालुक्‍यात पोलीस ठाण्‍यासमोर नागरिकांनी विनयभंग प्रकरणातील आरोपी रघुवेंद्र उपाध्‍याय याला ८ जानेवारी या दिवशी मारहाण केली. आरोपी उपाध्‍याय याला पोलिसांनी अटक केली आहे.

विशिष्‍ट वर्गाला हिंदु मुली या खेळाचे साधन वाटतात ! – आशिष शेलार, नेते, भाजप

लव्‍ह जिहादशी संबंधित घटनांमुळे सामाजिक बांधिलकी आणि ऐक्‍य यांना तडा जात आहे. त्‍यामुळे ‘लव्‍ह जिहाद’विरोधात राज्‍य सरकारने कायदा करावा आणि समस्‍त नागरिकांनीही या कायद्याला पाठिंबा द्यावा.

व्‍यवसाय आणि राजकारण यांमध्‍ये मराठीचा टक्‍का अल्‍प होत आहे ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

विश्‍लेषकांमध्‍येही अमराठी असणार्‍या व्‍यक्‍तींची नावे आहेत; मात्र मराठी नाव नाही. ही मानसिकता पालटायला हवी, यासाठी पुढाकार घ्‍यायला हवा, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्‍यक्‍त केले.

भाषेची टिंगलटवाळी टाळा ! – ज्‍येष्‍ठ नेते शरद पवार

भाषा लवचिक असेल, तरच तिचा प्रसार होतो. त्‍यासाठी बोलीभाषेच्‍या प्रसाराला वाव द्यायला हवा. भाषेच्‍या संदर्भातील टिंगलटवाळी टाळली पाहिजे, अशी अपेक्षा ज्‍येष्‍ठ नेते शरद पवार यांनी व्‍यक्‍त केली.

‘लव्‍ह जिहाद’च्‍या षड्‍यंत्राला असंख्‍य हिंदु युवती बळी पडल्‍या ! – सौ. रूपा महाडीक

फलटण (सातारा) येथे ५ सहस्र हिंदूंच्‍या उपस्‍थितीत ‘लव्‍ह जिहाद’ रोखण्‍याचा निर्धार !

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?

वास्तूचे व्यक्तीवर रात्रंदिवस परिणाम होतात. हे ज्ञात नसल्यामुळे आधुनिक वास्तूशास्त्रज्ञ केवळ हवा, उजेड आणि दिसायला वास्तू कशी दिसेल, यांचाच विचार करतात. याउलट धर्मात वास्तू कशी असली की, तिच्यामुळे त्रास होणार नाही, उलट तिच्यामुळे साधना करण्यास पूरक वातावरण मिळेल, याचा विचार केलेला असतो.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले