धारवाड (कर्नाटक) येथील मध्यवर्ती कारागृहातील घटना
वॉर्डन गंभीर घायाळ

(कारागृह वार्डन म्हणजे कारागृहाचे प्रमुख व्यवस्थापक, देखरेख करणारे अधिकारी)
धारवाड (कर्नाटक) – शिवमोग्गा येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्षा यांच्या हत्या प्रकरणातील मुसलमान आरोपींनी धारवाड मध्यवर्ती कारागृहात कारागृहाच्या ‘वॉर्डन’वर भीषण आक्रमण केले. यात ते गंभीर घायाळ झाले. या कैद्यांना कारागृह प्रशासनाने तात्काळ शिक्षा दिली आहे.
१. २० फेब्रुवारी २०२२ या दिवशी शिवमोग्गा येथे बजरंग दलाचे २६ वर्षीय कार्यकर्ते हर्षा यांची काही धर्मांध मुसलमानांनी चाकूने वार करत हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपींना धारवाड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
२. १३ जूनला एका किरकोळ कारणावरून या आरोपींनी कारागृहातील कर्मचार्यांशी वाद घातला. दोन्ही आरोपींनी तेथे कर्तव्यावर असलेल्या वॉर्डन किरण घोरपडे यांच्यावर अचानक आक्रमण केले. या आक्रमणात गंभीररित्या घायाळ झालेल्या किरण यांना तात्काळ धारवाडमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
३. कारागृहाच्या आत सरकारी कर्मचार्यावर झालेल्या या आक्रमणाची कारागृह प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून या आरोपींच्या विरोधात धारवाडच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
४. पुढील एका महिन्यासाठी या कैद्यांना कुटुंबातील कुठलाही सदस्य किंवा नातेवाईक भेटू शकणार नाही, अशी शिक्षा त्यांना देण्यात आली आहे. (अशांना १ महिना नाही, तर १ वर्ष त्यांच्या कुटुंबियांना न भेटण्याची शिक्षा दिली गेली पाहिजे ! – संपादक)
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी