तिघांना अटक !
बेळगाव (कर्नाटक) – येथे ८ जानेवारी या दिवशी होणार्या हिंदु सभेच्या सिद्धतेचा आढावा घेऊन सायंकाळी घरी परतणारे श्रीराम सेना आणि हिंदु राष्ट्र सेना या संघटनांचे जिल्हाध्यक्ष श्री. रविकुमार कोकीकतर यांच्यावर ७ जानेवारीला हिंडलगा येथील मराठी शाळेजवळ अज्ञातांनी गोळीबार केला. यात श्री. कोकीतकर यांच्या तोंडाला २ गोळ्या घासून गेल्याने ते घायाळ झाले. त्यांच्या वाहनचालकाच्या डाव्या खांद्याला गोळी लागल्याने तेही घायाळ झाले आहेत. दोघांना ‘के.एल्.ई.’ रुग्णालयात भरती करण्यात आले असून दोघांच्याही प्रकृतीला धोका नाही, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणी अभिजित भातकांडे, राहुल कोडचवाड आणि जोतिबा मुतगेकर या तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आक्रमण करणार्यांना कठोर शिक्षा द्या ! – प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना
या घटनेविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले, ‘‘या घटनेचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. हे कृत्य करणार्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी.’’
सभेला असलेल्या विरोधामुळे गोळीबार ?
८ जानेवारी या दिवशी शहरात छत्रपती संभाजी मैदानावर विराट हिंदु सभेचे आयोजन करण्यात आलेे होते. त्या सभेत हिंदु राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. धनंजय देसाई, तसेच श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी मार्गदर्शन केले. सभेला असलेल्या विरोधामुळे ही घटना घडल्याचेही बोलले जात आहे.
संपादकीय भूमिकाहिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर सातत्याने होणारी आक्रमणे चिंताजनक आहेत ! हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! |