अनुमोदना उत्सव पार पडला

पाबळ (जिल्हा पुणे) – शाह परिवारातील सुपुत्र कु. विरल पराग शाह यांनी जैन धर्मातील अत्यंत खडतर मानली जाणारी ‘श्री उपधान तप’ (मोक्षमाला) आराधना यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. या कठोर आत्मसाधनेची १४ जून या दिवशी मंगलमय सांगता झाली आहे. सांसारिक सुखाचा त्याग करून, गुरुदेवांच्या सान्निध्यात अनेक दिवस कडक नियमांचे पालन करत त्यांनी ही साधना पूर्ण केली. या अलौकिक त्यागाचा गौरव करण्यासाठी ‘श्री उपधान तप (मोक्षमाला) अनुमोदना उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा सोहळा पूज्य आचार्य भगवंत श्रीमद विजय विश्वकल्याण िवजयजी महाराजसाहेब आदी ठाणा यांच्या आशीर्वादाने पार पडला.
कु. विरल यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी ४८ दिवसांचे हे कठीण तप पूर्ण केल्याविषयी त्यांचे माता-पिता सौ. धनश्री आणि श्री. पराग शाह, त्यांची आजी सुलभा शाह यांच्यासह संपूर्ण जैन समाजात आनंदाचे वातावरण आहे. या मंगल प्रसंगी उपस्थित राहून सर्व स्नेही-जनांनी आणि भाविकांनी तपस्वी कु. विरल यांना उत्तम भावपूर्ण शुभाशीर्वाद दिले. (कु. विरल यांनी शाळेला सुट्या लागल्यावर हे तप केले. सुट्यांचा कालावधी त्यांनी सत्कारणी लावला. यातून इतर विद्यार्थ्यांनी बोध घ्यावा ! – संपादक)
उपधान तप याविषयी थोडक्यात !
उपधान तप हा जैन धर्मातील अत्यंत पवित्र, खडतर आणि आत्मशुद्धी करणारा साधना मार्ग आहे, ज्यामध्ये श्रावक-श्राविका काही काळासाठी (उदा. २८, ३५ किंवा ४८ दिवस) सांसारिक सुखांचा त्याग करून पूर्णपणे साधूंप्रमाणे जीवन जगतात. पूज्य गुरुदेवांच्या प्रत्यक्ष सान्निध्यात आणि मार्गदर्शनाखाली केल्या जाणार्या या तपात उपवास, एकासन आणि आयंबिल यांसारख्या कडक आहाराच्या नियमांसह ब्रह्मचर्य, भूमी शयन (भूमीवर झोपणे), श्वेत वस्त्र परिधान करणे आणि मौन पाळणे अनिवार्य असते. या कालावधीत साधक दिवसभर नवकार मंत्राचा जप, स्वाध्याय, सामायिक आणि दोन्ही वेळचे प्रतिक्रमण (पापांची क्षमा मागण्याची क्रिया) करून कर्म निर्जरेसाठी (कर्मांचा क्षय करण्यासाठी) स्वतःला झोकून देतो. थोडक्यात सांगायचे तर, गृहस्थ जीवनात राहूनही काही दिवसांसाठी साधुत्वाचा अनुभव घेणे आणि आत्मिक गुणांचा विकास करणे म्हणजेच ‘उपधान तप’ होय.
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली
सोलापूर विमानतळावर ‘प्रवासी सुविधा दिवस २०२६’ साजरा होणार
‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !
विशेष न्यायालयाने पोलीस उपअधीक्षकाचा जामीन फेटाळला !
१०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथे होणार !