सोलापूर विमानतळावर ‘प्रवासी सुविधा दिवस २०२६’ साजरा होणार 

सोलापूर – सोलापूर विमानतळ येथे प्रवाशांचा प्रवास अनुभव अधिक चांगला करण्यासाठी ‘प्रवासी सुविधा दिवस २०२६’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त प्रवाशांचे टिळा लावून आणि मिठाई देऊन स्वागत करण्यात येणार असून दिवसभर ‘वंदे मातरम्’चे गायन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध प्रवासी-केंद्रित उपक्रम आयोजित करण्यात येतील.

हा उपक्रम प्रवासी समाधान, सामुदायिक सहभाग आणि सेवा उत्कृष्टतेप्रती विमानतळाच्या बांधिलकीचे प्रतीक असल्याचे कार्यवाहक विमानतळ संचालक अंजनी कुमारी यांनी सांगितले.