सातारा जिल्ह्यातील सनातनच्या साधकांनी ‘घरोघरी लागवड मोहिमे’च्या अंतर्गत केलेले प्रयत्न !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळाची भीषणता ओळखून आम्हा साधकांना लागवडीचे अमूल्य ज्ञान दिले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळाची भीषणता ओळखून आम्हा साधकांना लागवडीचे अमूल्य ज्ञान दिले.
सनातनच्या घरोघरी लागवड मोहिमेला आरंभ झाल्यानंतर लागवड करतांना वाचकांना साहाय्य व्हावे, यासाठी चालू केलेल्या या लेखमालेचा १०० वा भाग आज प्रकाशित होत आहे.
‘जागतिक तापमान वाढ’ आणि ‘हवामानात होणारे पालट’ हे आता केवळ वर्तमानपत्रात वाचण्याचे शब्द राहिले नसून त्यांची झळ आपल्या दैनंदिन जीवनात सर्वांना जाणवू लागली आहे.
आपल्याकडील लागवडीमध्येही सर्वत्र पालापाचोळ्याचे जाड आच्छादन करावे. (पालापाचोळ्याने भूमी झाकावी.) त्यामुळे कडक उन्हापासून मातीचे रक्षण होते अन् ओलावा टिकून रहाण्यास साहाय्य होते.
सध्या पेठेमध्ये मिळणार्या कुंड्यांचे मूल्य पुष्कळ आहे. त्यामुळे मोठ्या कुंड्या नसतील, तर गोण्या किंवा पोती यांत लागवड करता येते.
ज्याप्रमाणे पातेलेभर दुधात एक चमचा दही किंवा ताक घातले, तरी सर्व दुधाचे दही होते; त्याचप्रमाणे जीवामृत अल्प प्रमाणात उपयोगात आणून संपूर्ण शेतातील उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची संख्या पुष्कळ प्रमाणात वाढवता येते.
दुधी भोपळा, लाल भोपळा, दोडके, कारले इत्यादी वेलवर्गीय भाज्यांना, तसेच अनेक फळझाडांना फळमाशीचा उपद्रव होतो. ही माशी कोवळ्या फळाला डंख मारून त्यात स्वतःची अंडी घालते.
मला पूर्वीपासून औषधी वनस्पती, भाजीपाला आणि फळझाडे लावण्याची आवड होती. वर्ष २०२१ पासून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून ‘घरोघरी लागवड मोहीम’ चालू झाली.
सुरण ही लागवड करण्यास अतिशय सोपी आणि अनेक औषधी गुणधर्म असलेली कंद भाजी आहे. सुरणाच्या गोलाकार कंदाला जो फुगीर भाग (डोळा) असतो, तेथून नवीन कोंब फुटतो. या कोंबाची लागवड करून नवे रोप लावता येते.