अयोध्येतील (उत्तरप्रदेश) कुमारगंज येथे पार पडली हिंदु धर्मजागृती सभा
अयोध्या (उत्तरप्रदेश) – कालमहात्म्यानुसार हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे; परंतु ज्याप्रमाणे सूर्यास्तानंतर अंधार दूर करण्यासाठी दिवाही त्याचे योगदान देतो, त्याप्रमाणे आपण हिंदूंनीही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिदिन न्यूनतम १ घंटा देण्याचा संकल्प करावा लागेल, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी धर्मसभेत केले. समितीच्या वतीने अयोध्येतील कुमारगंज येथील सरस्वती शिशू मंदिरामध्ये हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या सभेला परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण
वाराणसीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये धर्मप्रेमी श्री. मनीष गुप्ता प्रथमच सहभागी झाले होते. या अधिवेशनातून प्रेरणा घेऊन त्यांनी त्यांच्या गावामध्ये या सभेचे आयोजन केले होते.
क्षणचित्रे
१. धर्मसभेच्या दिनी कुमारगंज येथील एका व्यावसायिकाचे अकस्मात् निधन झाले होते. तरीही येथील व्यापारी वर्ग धर्मसभेत उपस्थित होता.
२. सभेला उपस्थित एका पत्रकाराने सुचवले की, ‘हिंदु जनजागृती समितीने स्पर्धात्मक परीक्षांमध्ये हिंदु धर्माशी संबंधित अभ्यासक्रम असावा’, यासाठी याचिका करावी.
३. या सभेसाठी धर्मप्रेमी श्री. लल्लन गुप्ता हे कानपूर येथून अयोध्येला २४१ कि.मी. दूरचा प्रवास करून उपस्थित होते.
४. या सभेसाठी कुमारगंजसह गोयडी, कौशलपुरी, शिवनाथपूर, सिधौना, पिठला आणि बिरोैलीझाम अशा विविध भागांतील लोक उपस्थित होते.