सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ६१
‘हिवाळ्यात पेठेमध्ये भाजीपाला पुष्कळ प्रमाणात येत असतो. त्यामुळे साहजिकच आपल्या घरी येणार्या भाजीपाल्याच्या प्रमाणातही वाढ होते आणि पर्यायाने स्वयंपाकघरातून मिळणार्या ओल्या कचर्याचेही प्रमाण वाढते. हा अधिकचा ओला कचरा (उदा. मटारची साले, कोथिंबीर, तसेच अन्य पालेभाज्यांचे देठ) उन्हामध्ये वाळवून ठेवावा. सुकल्यानंतर याचे आकारमान अल्प होते आणि आपल्याला आवश्यकता असेल त्यानुसार कुंड्या भरतांना किंवा आच्छादनासाठी (भूमी झाकण्यासाठी) याचा उपयोग करता येतो.’ (०३.१.२०२३)
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, फोंडा, गोवा.