आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या रशियाच्या नागरिकाला कारावास

प्रतिकात्मक चित्र

सावंतवाडी – अवैधरित्या वास्तव्य केल्याच्या प्रकरणी युरी ब्लादिमिर वीच बोझकाे (वय ४४ वर्षे) या रशियाच्या नागरिकाला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी १० महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा आणि ५ सहस्र रुपये दंड अन् दंड न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास, अशी शिक्षा ठोठावली आहे.

ऑगस्ट २०२५ मध्ये बोझको या रशियाच्या नागरिकाला रेडकरवाडी, आरोंदा येथील बळवंत शांताराम केरकर यांनी स्वत:च्या घरी वास्तव्य करण्यासाठी अनुमती दिली होती. याविषयी केरकर यांनी प्रशासनास कळवणे बंधनकारक होते; मात्र त्यांनी तसे केले नाही. त्याचप्रमाणे बोझको हे अधिकृत पारपत्राविना रहात असल्याचे चौकशीत सिद्ध झाले होते. या प्रकरणी बोझको आणि केरकर यांच्या विरुद्ध दोषारोप ठेवण्यात आले होते. यावर १५ जून या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने  बोझको यांना शिक्षा ठोठावली; मात्र केरकर यांना सबळ पुराव्याच्या अभावी दोषमुक्त केले.