सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात संमेलनाचे आयोजन

पुणे – ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा’चे १०० वे साहित्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या प्रांगणात २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत होणार आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये पुण्यात होणारे हे १४ वे संमेलन आहे, अशी माहिती ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा’चे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, ‘समर्थ युवा फाऊंडेशन’चे अध्यक्ष राजेश पांडे उपस्थित होते. विद्यापिठाच्या मुख्य इमारतीचे प्रांगण, क्रीडा संकुल, छत्रपती संभाजी महाराज सभागृह येथे संमेलनातील महत्त्वाचे कार्यक्रम होणार आहेत. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले पुतळा परिसरात कवीकट्टा, कथाकथन असे उपक्रम होतील. शहरातील वाहतूककोंडी आणि सुविधा यांवर ताण पडू नये, यामुळे हे संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात घेण्याचा निर्णय घेतला, असे सोमण यांनी स्पष्ट केले. ‘नांदी शंभराव्या साहित्य संमेलना’ची या उपक्रमातून मुंबई, पुणे वगळता जेथे साहित्य संमेलने झाली आहेत, अशा महाराष्ट्रातील ४८ ठिकाणांसह, विविध भागांत संमेलनपूर्व ९९ साहित्यिक उपक्रमांमधून आगामी संमेलनाची नांदी होणार आहे. १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम होतील, अशी माहिती योगेश सोमण यांनी सांगितली.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !