
कोल्हापूर – श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात मुख्य मंदिराच्या कळसावर सोन्याचा कळस बसवण्यात आल्यानंतर आता उर्वरित ४ कळसही सोन्याचे करण्याचा संकल्प ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’ने केला आहे. त्यासाठी काही दानशूर भाविकांसाठी समितीने पत्रव्यवहार चालू केला आहे.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिराची रचना, ही त्रिकुट प्रासाद आकारात आहे. श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचा मुख्य गाभारा, त्यासमोर मातृलिंग नंदी मंडपाचे एक शिखर, एका बाजूला महाकाली मंदिर, दुसर्या बाजूला सरस्वती मंदिर आणि समोर श्री गणपति मंदिर, असे ५ शिखर मंदिरावर आहेत. मुख्य गाभार्यावरील शिखरावर दीड किलो सोन्याचा कळस बसवण्यात आला असून आता या पुढचे पाऊल उचलत देवस्थान समितीने उर्वरित ४ शिखरसुद्धा सोन्याचे करण्याचा संकल्प केला आहे. नवरात्रोत्सवापूर्वी उर्वरित ४ शिखरही सोन्याचे बनवले जाणार आहेत.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !