विशेष न्यायालयाने पोलीस उपअधीक्षकाचा जामीन फेटाळला !

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

प्रतिकात्मक छायाचित्रं

मुंबई – एका उद्यानात ९ वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक केलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. त्याच्या विरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

विशेष न्यायाधिशांना आदेशात म्हटले की, या प्रकरणातील आरोपी उच्च पदावरील पोलीस अधिकारी असून त्याला गुन्ह्याचे स्वरूप आणि परिणाम यांची जाणीव आहे. अन्वेषण प्राथमिक टप्प्यात असल्याने आरोपीला जामिनावर मुक्त करणे योग्य ठरणार नाही. पीडित मुलगी केवळ ९ वर्षांची असून तिने आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवण्याचे कोणतेही कारण नाही.

संपादकीय भूमिका

पोलीस दलासाठी कलंक ठरलेल्या अशा पोलिसांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी !