अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर लागवड करूया !

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर घरी किंवा शेतात बियाणे पेरून लागवड करा !

वाचकांचे अभिप्राय

सनातनच्या घरोघरी लागवड मोहिमेला आरंभ झाल्यानंतर लागवड करतांना वाचकांना साहाय्य व्हावे, यासाठी चालू केलेल्या या लेखमालेचा १०० वा भाग आज प्रकाशित होत आहे.

घरच्या घरी लागवड करण्याचे गांभीर्य जाणून कृतीशील होऊया !

‘जागतिक तापमान वाढ’ आणि ‘हवामानात होणारे पालट’ हे आता केवळ वर्तमानपत्रात वाचण्याचे शब्द राहिले नसून त्यांची झळ आपल्या दैनंदिन जीवनात सर्वांना जाणवू लागली आहे.

उन्‍हाळ्‍यात पालापाचोळ्‍याची साठवणूक करून ठेवावी !

आपल्‍याकडील लागवडीमध्‍येही सर्वत्र पालापाचोळ्‍याचे जाड आच्‍छादन करावे. (पालापाचोळ्‍याने भूमी झाकावी.) त्‍यामुळे कडक उन्‍हापासून मातीचे रक्षण होते अन् ओलावा टिकून रहाण्‍यास साहाय्‍य होते.

लागवडीसाठी धान्‍याच्‍या रिकाम्‍या गोण्‍यांचा सदुपयोग करावा !

सध्‍या पेठेमध्‍ये मिळणार्‍या कुंड्यांचे मूल्‍य पुष्‍कळ आहे. त्‍यामुळे मोठ्या कुंड्या नसतील, तर गोण्‍या किंवा पोती यांत लागवड करता येते.

जीवामृत (टीप) हे खत नसून सूक्ष्म जीवाणूंचे विरजण आहे !

ज्‍याप्रमाणे पातेलेभर दुधात एक चमचा दही किंवा ताक घातले, तरी सर्व दुधाचे दही होते; त्‍याचप्रमाणे जीवामृत अल्‍प प्रमाणात उपयोगात आणून संपूर्ण शेतातील उपयुक्‍त सूक्ष्म जीवाणूंची संख्‍या पुष्‍कळ प्रमाणात वाढवता येते.

वेलवर्गीय भाज्यांचे फळमाशीपासून रक्षण करण्यासाठी सोपा उपाय !

दुधी भोपळा, लाल भोपळा, दोडके, कारले इत्यादी वेलवर्गीय भाज्यांना, तसेच अनेक फळझाडांना फळमाशीचा उपद्रव होतो. ही माशी कोवळ्या फळाला डंख मारून त्यात स्वतःची अंडी घालते.

सुरण कसे लावावे ?

सुरण ही लागवड करण्यास अतिशय सोपी आणि अनेक औषधी गुणधर्म असलेली कंद भाजी आहे. सुरणाच्या गोलाकार कंदाला जो फुगीर भाग (डोळा) असतो, तेथून नवीन कोंब फुटतो. या कोंबाची लागवड करून नवे रोप लावता येते.

लहान रोप मुख्‍य कुंडीत लावतांना संध्‍याकाळी लावावे !

रोपवाटिकेतून आणलेले रोप पिशवीतून कुंडीमध्‍ये लावतांना किंवा भाजीपाल्‍याचे लहान रोप कुंडीत किंवा वाफ्‍यात लावतांना शक्‍यतो संध्‍याकाळच्‍या वेळी लावावे.

वेलवर्गीय भाज्‍यांमधील नर आणि मादी फूल यांची ओळख !

परागीभवन म्‍हणजे नर फुलातील पुंकेसर मादी फुलातील स्‍त्रीकेसरांवर पडून फलधारणा होण्‍याची क्रिया. मिरची, वांगी, टोमॅटो, यांसारख्‍या झाडांना द्विलिंगी फुले असतात, म्‍हणजे एकाच फुलात स्‍त्रीकेसर अन् पुंकेसर असतात.