म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार

पणजी – म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटीचा लाभ घेऊन पसार झाला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षायंत्रणा सक्रीय झाल्या असून पसार झालेल्याचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम आरंभली आहे. राज्यातील विविध तपासणीनाक्यांवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वेस्थानके, बसस्थानके आणि विमानतळे येथे देखरेख ठेवण्यात आली आहे. नागरिकांना याविषयी माहिती मिळाल्यास ती पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे स्थानबद्धता केंद्रातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.