उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाकडून आय.एस्.आय.च्या २ हस्तकांना अटक

देशविरोधी कारवायांसाठी पाकिस्तान पुरवत होता पैसे !

डावीकडून रियाजुद्दीन आणि अमृतपाल सिंह

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशाच्या आतंकवादविरोधी पथकाने आय.एस्.आय.च्या २ हस्तकांना अटक केली आहे. रियाजुद्दीन आणि अमृतपाल सिंह उपाख्य अमृत गिल अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही भारतातील सैन्य तळ आणि अन्य महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणांची माहिती आय.एस्.आय.ला पाठवत होते. या सर्वांच्या बँक खात्यांमध्ये भारतात देशविरोधी कारवाया करण्यासाठी पैसे पाठवण्यात आले होते. रियाजुद्दीन याच्या खात्यात गेल्या वर्षी ७० लाख रुपयांचा व्यवहार झाला होता. या प्रकरणी यापूर्वी इजहारुल हुसैन याला बिहारमध्ये अटक करण्यात ओली आहे.

संपादकीय भूमिका 

अशा देशद्रोह्यांना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !