मुंबई – अग्निवीर प्रशिक्षण घेणार्या २० वर्षीय तरुणी अपर्णा नायर यांनी मालाड येथे आत्महत्या केली. नौदलाच्या आय.एन्.एस्. हमला येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. ती प्रशिक्षणासाठी आय.एन्.एस्. हमला येथे आली होती. तेथील रहात्या खोलीमध्ये तिने गळफास लावून आत्महत्या केली. प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यामुळे नौदलाच्या आधुनिक वैद्यांनी तिला पडताळून मृत घोषित केले.
संपादकीय भूमिकानैराश्यात जाणारी तरुण पिढी अग्निवीर म्हणून कशी सिद्ध होणार ? |