सर्वेक्षण अहवाल सादर करण्यासाठी मागितला ३ आठवड्यांचा वेळ

ज्ञानवापी प्रकरण !


वाराणसी – ज्ञानवापी प्रकरणातील भारतीय पुरातत्व विभागाचा (ए.एस्.आय.चा) अहवाल २८ नोव्हेंबर या दिवशी जिल्हा न्यायालयात सादर करण्यात येणार होता; मात्र पुन्हा एकदा सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी  पुरातत्व विभागाने ३ आठवड्यांची मुदत मागितली आहे.

ज्ञानवापीचा सर्वेक्षण अहवाल न्यायालयात सादर करण्याची मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार १०० दिवस ज्ञानवापीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणावर आधारित एक व्हिडिओही बनवण्यात आला आहे. सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर केल्यानंतर ‘ज्ञानवापी संकुलात नेमके काय आहे ?’, हे कळणार आहे.

हे पण वाचा :

ज्ञानवापीचा सर्वेक्षण अहवाल सादर करण्यासाठी आणखी १५ दिवसांच्या मुदतीसाठी न्यायालयात याचिका