कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या वेळी परीक्षार्थी विवाहितांना मंगळसूत्र काढण्यास भाग पाडले !

कॉपी रोखण्याच्या नावाखाली असा तुघलकी प्रकार करणार्‍यांवर कठोर कारवाई केली, तर इतरांवर त्याचा वचक बसेल ! काँग्रेसच्या राज्यात मुसलमानांना सूट, तर हिंदूंना कायद्याचा बडगा, असाच प्रकार चालू आहे. काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंच्या हे आता लक्षात येत आहे का ?

जिंद (हरियाणा) येथे ५० अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणार्‍या मुख्याध्यापकाला अटक !

शिक्षकांकडूनच असे कृत्य होत असतील, तर पालकांनी विश्‍वास कुणावर ठेवायचा ? अशांना फाशीचीच शिक्षा दिल्यावर इतरांवर वचक बसेल !

एअर इंडियाने ३० नोव्हेंबरपर्यंत तेल अविवकडे जाणारी प्रवासी वाहतूक केली स्थगित !

साधारणपणे, देहलीतून तेल अविवला जाण्यासाठी आठवड्यातून ५ वेळा उड्डाणे असतात. परंतु आता वाढत्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर ही उड्डाणे रहित करण्यात आली आहेत.

‘गाझावर अणूबाँब टाका’, असे म्हणणारे इस्रायलचे मंत्री निलंबित !

पंतप्रधान नेतान्याहू म्हणाले की, इलियाहू यांचे वक्तव्य वास्तविकतेवर आधारित नाही. इस्रायल निष्पापांना दुखापत होऊ नये; म्हणून आंतरराष्ट्रीय कायद्याच्या सर्वोच्च मानकांनुसार कार्य करत आहे.

सिंधुदुर्ग : मालवण किनारपट्टीवरील प्रशासनाने नोटीस पाठवलेल्या बांधकामांचे फेरसर्वेक्षण होणार !

प्रशासन आम्हाला अनधिकृत ठरवत असेल, तर त्या भूमीचे सर्वेक्षण करून प्रशासनाने खात्री करावी. आम्ही अनधिकृत भूमीत रहात नाही हे सिद्ध होईल’, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. याविषयी प्रशासनालाही निवेदने देण्यात आली होती.

गोवा : ढवळी येथील श्री भगवतीदेवीच्या नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना

रविवार, ५ नोव्हेंबर या दिवशी कपिलेश्वर पंचायतनातील एक देवता असलेली ढवळी येथील श्री भगवतीदेवीच्या नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

वाहनशुल्कामुळे फेरीबोटींवर होणारा खर्च भरून येईल ! – नदी परिवहन मंत्री फळदेसाई, गोवा

फेरीसेवेच्या अत्याधुनिकीकरणासाठी प्रस्ताव मांडल्यावर महसूल विभागाकडून प्रत्येक वेळी फेरीसेवेतून महसूल मिळत नसल्याचे सूत्र सांगितले जाते. त्यामुळे सामान्य नागरिकांचा खर्च न वाढवता फेरीबोटीतील वाहनांना शुल्क आकारले जात आहे.

गोवा : आसगाव, म्हापसा येथे पादत्राणांसह मंदिरात घुसल्याच्या प्रकरणात ख्रिस्ती दोषी

चर्चमध्ये जाऊन हिंदूंनी असे काही केले असते, तर राज्यभर काँग्रेस आणि त्यांचे पाठीराखे पुरो(अधो)गामी, धर्मनिरपेक्षतावाले यांनी गदारोळ केला असता !

गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील एस्.टी. कामगार संघटनेचा ६ नोव्हेंबरपासून संप !

गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील ‘एस्.टी. कष्टकरी जनसंघ’ या एस्.टी. कामगार संघटनेने ६ नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

सोलापूर येथील अमली पदार्थ बनवणार्‍या कारखान्यावर नाशिक पोलिसांची कारवाई !

मोहोळ औद्योगिक वसाहतीत ‘मॅफेड्रॉन’ नावाचा अमली पदार्थ बनवणार्‍या कारखान्यावर नाशिक येथील अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई केली आहे.