मुंबई – गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील ‘एस्.टी. कष्टकरी जनसंघ’ या एस्.टी. कामगार संघटनेने ६ नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. एस्.टी. प्रवाशांसह एस्टी. महामंडळालाही याचा फटका बसू शकतो.
सदावर्ते म्हणाले की, एस्.टी. महामंडळाच्या ताफ्यात ८५ टक्के नादुरुस्त बसगाड्या धावत आहेत. सातवा वेतन आयोग आणि इतर कर्मचार्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. या संपात ६८ सहस्र कर्मचारी सहभागी होणार आहेत.
संपादकीय भूमिकाऐन सणाच्या कालावधीत संप करून जनतेला वेठीस धरण्यापेक्षा वैध मार्गाने मागण्या करा ! |