एअर इंडियाने ३० नोव्हेंबरपर्यंत तेल अविवकडे जाणारी प्रवासी वाहतूक केली स्थगित !

नवी देहली – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर एअर इंडियाने तेल अविव (इस्रायल) येथे जाणारी नियोजित उड्डाणे काही काळासाठी स्थगित केली आहेत. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, तेल अविवची उड्डाणे ३० नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. साधारणपणे, देहलीतून तेल अविवला जाण्यासाठी आठवड्यातून ५ वेळा उड्डाणे असतात. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी अशी ही सेवा असते; परंतु आता वाढत्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर ही उड्डाणे रहित करण्यात आली आहेत.