पणजी : आसगाव (म्हापसा) येथील मंदिरात २१ फेब्रुवारी २०२० या महाशिवरात्रीला भजन आणि पूजा चालू असतांना मंदिरात पादत्राणे घालून आलेल्या डेसमंड अल्वारेस या ख्रिस्ती व्यक्तीला धार्मिक कार्यक्रमात अडथळा आणल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे; परंतु वयोवृद्धता आणि आरोग्याच्या तक्रारी यांमुळे त्याला कारावासाची शिक्षा देण्यात आलेली नाही.
या प्रकरणी उमेश टंकसाळी यांनी तक्रार केली होती. अल्वारेस याने भजन आणि पूजा चालू असतांना पादत्राणे घालूनच मंदिरात प्रवेश केला अन् तेथील ध्वनीक्षेपक यंत्रणेच्या तारा काढू लागला. या वेळी अल्वारेस याने पादत्राणे काढण्यास नकार दिला आणि वाद घालत तक्रारदार अन् अन्य एक व्यक्ती यांना धमकीही दिली होती. या प्रकरणाची सुनावणी करतांना न्यायदंडाधिकार्यांनी त्याला दोषी ठरवले; मात्र वय पहाता केवळ दंड ठोठावला. त्याचप्रमाणे अल्वारेस याला तक्रारदारांना भरपाई देण्यासही सांगितले.
संपादकीय भूमिकाचर्चमध्ये जाऊन हिंदूंनी असे काही केले असते, तर राज्यभर काँग्रेस आणि त्यांचे पाठीराखे पुरो(अधो)गामी, धर्मनिरपेक्षतावाले यांनी गदारोळ केला असता ! |