सतर्कता आणि स्‍वसंरक्षण प्रशिक्षण हाच महिलांवरील अत्‍याचार थांबवण्‍याचा उपाय ! – सौ. धनश्री केळशीकर, प्रवक्‍त्‍या, सनातन संस्‍था

[WPI_DISPLAY_SHARE_ICONS]
स्‍वसंरक्षण प्रात्‍यक्षिके करतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

मुंबई – आज आपल्‍या देशात प्रत्‍येक चौदाव्‍या मिनिटाला बलात्‍कार होतो. साक्षीला भर रस्‍त्‍यात चाकूचे अनेक वार करून मारले जाते. त्‍या वेळी आजूबाजूची माणसे केवळ बघ्‍याची भूमिका घेतात. या घटनेवरून समाजाची दायित्‍वशून्‍यता दिसून येते.

सौ. धनश्री केळशीकर

एका पहाणीनुसार १८ ते ३० वयोगटातील ६० टक्‍के महिलांना शारीरिक अत्‍याचाराला कधी ना कधी सामोरे जावे लागते. ही भयावह आकडेवारी पहाता समाजातील प्रत्‍येक  महिलेची सतर्कता आणि स्‍वसंरक्षण प्रशिक्षण हाच महिलांच्‍या अत्‍याचारांवरील उपाय आहे, असे प्रतिपादन सनातन संस्‍थेच्‍या प्रवक्‍त्‍या सौ. धनश्री केळशीकर यांनी येथे केले. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळ, नरे पार्क येथे ‘राजे फाऊंडेशन’च्‍या वतीने आयोजित ‘नारी तू रणरागिणी हो’ या कार्यक्रमात त्‍या बोलत होत्‍या. या वेळी सौ. धनश्री केळशीकर यांनी महिलांवर होणारे अत्‍याचार आणि लव्‍ह जिहाद यांविषयी उपस्‍थितांना संबोधित केले. त्‍या म्‍हणाल्‍या की, आपण आपल्‍या मुलींना विविध प्रकारच्‍या कला, शिक्षण, नृत्‍य शिकवण्‍यासाठी पाठवतो; मात्र मुलींना स्‍वरक्षण करण्‍यासाठी साहाय्‍य असणार्‍या कला शिकवत नाही. महिलांवरील वाढते अत्‍याचार पहाता सर्व पालकांनी स्‍वत:च्‍या मुलींना स्‍वसंरक्षणाचे शिक्षण दिलेच पाहिजे.

‘राजे फाऊंडेशन’चे संस्‍थापक अध्‍यक्ष श्री. सिद्धांत पिसाळ, संस्‍थापक सचिव श्री. रोहित पिसाळ, खजिनदार श्री. पंकज कोल्‍हे, कार्यकारणी सदस्‍य श्री. संतोष पवार, ‘परळचा राजा’ नरे पार्क मंडळाचे अध्‍यक्ष श्री. दत्ताराम शिरोडकर आणि कार्यकारणी सदस्‍य श्री. स्‍वप्‍निल गुरव हे या वेळी उपस्‍थित होते.

‘परळचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्‍सवात सहभागी ‘राजे फाउंडेशन आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते
राजे फाऊंडेशन ही संस्‍था गेल्‍या दशकापासून मुंबई, तसेच महाराष्‍ट्रात कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवविचार आणि शिवसंस्‍कार यांचा महाराष्‍ट्रभर प्रसार करणे हे संस्‍थेचे मूळ ध्‍येय आहे. रक्‍तदान शिबिर, आरोग्‍य शिबिर, शिवजन्‍मोत्‍सव सोहळा, शिववक्‍तृत्‍व स्‍पर्धा, विद्यार्थी गुणगौरव आणि पारितोषिक वितरण, किल्ले संवर्धन आणि वृक्षारोपण मोहीम असे विविध कार्यक्रम आणि समाजोपयोगी कामे संस्‍था आयोजित करत असते.

विशेष  

या वेळी हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यकर्त्‍यांनी स्‍वसंरक्षणाचे महत्त्व विशद करणारी एक लघुनाटिका आणि स्‍वसंरक्षण प्रात्‍यक्षिके करून दाखवली. यामुळे उपस्‍थितांना लव्‍ह जिहादची दाहकता आणि त्‍याला प्रत्‍युत्तर म्‍हणून स्‍वसंरक्षणाची किती आवश्‍यकता आहे ? हे लक्षात आले.

[WPI_DISPLAY_SHARE_ICONS][RELATED_ARTICLES]