मुद्रांक शुल्क बुडवल्याचे उघड !
पुणे – भ्रमणभाष टॉवर उभारणीसाठी भ्रमणभाष आस्थापने खासगी जागा भाड्याने घेतात. या वेळी खासगी जागामालक आणि भ्रमणभाष आस्थापनांमध्ये ५०० ते १ सहस्र रुपयांच्या मुद्रांक दस्तऐवजावर ५ ते १० वर्षांसाठी ‘लिव्ह अँड लायसन्स’ करार केला जातो. यानुसार भूमीच्या २५ टक्के बाजारमूल्याच्या रकमेवर आस्थापनाने ५ टक्के मुद्रांक शुल्क भरणे अपेक्षित आहे; परंतु यातून पळवाट काढण्यासाठी असा करार न करता मुद्रांक शुल्क बुडवल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाने एका आस्थापनाला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे, तसेच पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत इतर आस्थापनांच्या विषयी असे झाले आहे का ? याची माहिती महापालिकेकडून मागवली आहे.
संपादकीय भूमिकाग्राहकांकडून भरमसाठ पैसे उकळणार्या भ्रष्ट भ्रमणभाष आस्थापनांंवर कडक कारवाई आवश्यक ! |