आजमगड (उत्तरप्रदेश) येथे प्रार्थना सभेच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न !

ख्रिस्ती आणि मुसलमान हिंदूंना आमीष दाखवून अथवा बळजोरीने त्यांचे धर्मांतर करतात. हिंदू असे कधीच करत नाहीत, तरीही पुरोगामी आणि हिंदुद्वेष्टे यांच्याकडून नेहमी हिंदूंनाच असहिष्णु ठणवले जाते, हे जाणा !

चीन श्रीलंकेमध्ये गरिबांना १९ सहस्र घरे बांधून देणार !

चीन सातत्याने श्रीलंकेला कोणत्या ना कोणत्या कारणाद्वारे स्वतःच्या नियंत्रणात घेण्याचा किंवा त्याचा भारताच्या विरोधात वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनच्या या डावपेचाला भारताने तितकेच रोखठोक प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे !

६ ऑक्टोबरपर्यंत ‘विक्रम’ आणि ‘प्रज्ञान’ जागे होण्याची प्रतीक्षा करू ! – इस्रो

चंद्रयान-३चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवार उतरल्यानंतर १४ दिवस त्यांनी तेथील माहिती पाठवली. १४ दिवसांनी तेथे त्यापुढील १४ दिवसांसाठी सूर्य मावळल्याने अंधार झाला. या काळात येथे प्रचंड थंडी असते. त्यामुळे ‘विक्रम’ आणि ‘प्रज्ञान’ यांचे काम इस्रोकडून बंद करण्यात आले होते.

सरकारने कुणाच्याही परंपरांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये ! – सर्वोच्च न्यायालय

देशातील मंदिरांचे होणारे सरकारीकरण थांबवून सर्व मंदिरे सरकारीकरण मुक्त करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने कायदा करावा, अशीच देशातील हिंदूंची अपेक्षा आहे !

शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीकडून ट्रुडो यांच्या भारतावरील आरोपांचे समर्थन

भारतावर बिनबुडाचे आरोप करणार्‍यांचे समर्थन करणार्‍या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीकडून भारत सरकारने स्पष्टीकरण मागितले पाहिजे !

आसिफने लावले हिंदु संघटनांच्या नावे मुसलमानांना धमकी देणारे फलक !

गुरुग्राममध्ये विश्‍व हिंदु परिषद (विहिंप) आणि बजरंग दल यांना अपकीर्त करण्याचे मुसलमानांनी रचलेले षड्यंत्र उघड झाले आहे. येथील आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाने विहिंप आणि बजरंग दल यांच्या नावाने शहरात फलक  लावले.

७२ वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी बर्लिन (जर्मनी) येथील कार्डिनलचा पुतळा हटवला !

या घटनेवरून आता असे किती पाद्री जिवंत किंवा मृत आहेत, ज्यांच्यावर असे आरोप करण्यात आले आहेत, त्याचे अन्वेषण झाले पाहिजे, असेच लक्षात येते !

कोल्हापूर : जिल्हाधिकार्‍यांनी शेतकरी संघाची इमारत बळजोरीने कह्यात घेतली !

‘‘संघाची जागा बळजोरीने कह्यात घेऊन कोल्हापूरचे नाक कापण्याचे काम केले जात आहे. ‘बैल’ बसला आहे; म्हणून त्याला कुणी चुकीच्या पद्धतीने डिवचण्याचे काम करू नये. जिल्ह्यात संघाचे ४० सहस्र सभासद आहेत आणि २ लाख मतदार आहेत. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत धडा शिकवल्याविना रहाणार नाहीत.’’

२६/११ या मुंबईतील आतंकवादी आक्रमणाच्‍या प्रकरणी तहव्‍वूर हुसैन राणाविरोधात आरोपपत्र प्रविष्‍ट !

या आक्रमणातील आरोपी डेव्‍हिड हेडली याने राणा यास ईमेल पाठवल्‍याची, तसेच राणासमवेत एकत्रित प्रवास केल्‍याचीही माहिती पोलिसांच्‍या हाती लागली आहे.

विसर्जनाच्‍या पार्श्‍वभूमीवर सातारा येथील ६१ जणांवर प्रतिबंधात्‍मक कारवाई !

कारवाई करण्‍यात आलेल्‍या ६१ जणांना २७ ते २९ सप्‍टेंबर या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत सातारा तालुक्‍यात थांबण्‍यास प्रतिबंध करण्‍यात आला आहे, अशी माहिती शहर पोलिसांनी दिली.