चीन श्रीलंकेमध्ये गरिबांना १९ सहस्र घरे बांधून देणार !

भारताचा असाच प्रकल्प अद्यापही रखडलेला !

कोलंबो (श्रीलंका) – गरीब कुटुंबांसाठी १९ सहस्रांहून अधिक परवडणारी घरे बांधण्यासाठी श्रीलंका ऑक्टोबरमध्ये चीनसमवेत करार करणार आहे. बीजिंगमध्ये ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ (बी.आर्.आय.) शिखर परिषदेच्या वेळी हा करार होणार आहे. त्यात राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघेही सहभागी होणार आहेत, अशी माहिती श्रीलंकेचे नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री प्रसन्ना रणतुंगा यांनी दिली. चीनच्या या प्रयत्नातून तो श्रीलंकेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे भारतानेही येथे अल्प उत्पन्न गटांसाठी घरे बांधण्याचे आश्‍वासन दिले आहे; मात्र सध्ये हे प्रकल्प रखडले आहेत. वर्ष २०१० मध्ये भारत सरकारने ३ सहस्र ३०० कोटी रुपये खर्चून ५० सहस्र घरे बांधण्याची घोषणा केली होती.

वर्ष २०२२ मध्ये श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक संकटात चीनने श्रीलंकेत सरकार, मंदिरे, राजकीय पक्ष आणि चीनच्या मैत्रीपूर्ण सामाजिक संस्था यांंद्वारे शिधा वाटप केला होता. तसेच अनुमाने २ सहस्र घरे बांधण्यास साहाय्यही केले होते.

संपादकीय भूमिका 

  • चीन सातत्याने श्रीलंकेला कोणत्या ना कोणत्या कारणाद्वारे स्वतःच्या नियंत्रणात घेण्याचा किंवा त्याचा भारताच्या विरोधात वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनच्या या डावपेचाला भारताने तितकेच रोखठोक प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे !
  • चीन भारताचा शत्रू आहे आणि भारत आपल्याला साहाय्य करत आहे, हे लक्षात घेऊनही श्रीलंका चीनला त्याच्या देशात साहाय्याच्या नावाखाली घुसखोरी करू देत असेल, तर भारताने श्रीलंकेला योग्य भाषेत समज देण्याची आवश्यकता आहे !