सलमान आणि त्रिभुवन राम या दोघा ख्रिस्त्यांना अटक !
आजमगड (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील मेहराजपूर क्षेत्रातील लालमऊ गावात हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. येथे सलमान आणि त्रिभुवन राम या ख्रिस्त्यांनी एका प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. सभेसाठी ध्वनीक्षेपक यंत्रणेची व्यवस्थाही करण्यात आली होती. गावातील रवींद्र राम नावाच्या हिंदूने यासंदर्भात दोघा ख्रिस्त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केल्यावर पोलिसांनी त्वरित सलमान आणि त्रिभुवन राम यांना अटक केली. या वेळी त्यांच्याकडून बायबलच्या १० प्रती, १ दुचाकी गाडी आणि ध्वनीक्षेपक यंत्रणा हस्तगत करण्यात आली.
रवींद्र रामने तक्रारीत म्हटले की, दोघेही ‘गावातील हिंदूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारावा’, यासाठी त्यांना आमीष दाखवत होते आणि धर्मांतर करण्यासाठक्ष दबाव आणत होते. २४ सप्टेंबर या दिवशी प्रार्थना सभेच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मांतराचे षड्यंत्र रचण्यात आले होते. हिंदूंना पैशांचे आमीष दाखवण्यासमवेत मुलांना चांगल्या शाळेमध्ये शिक्षण देण्याचे आश्वासन दिले जात होते. प्रार्थना सभेच्या आयोजनाची अनुमतीही घेण्यात आली नव्हती. पोलिसांनी सलमान आणि त्रिभुवन राम या दोघांविरुद्ध उत्तरप्रदेश धर्मांतरविराधी अधिनियमाच्या कलम २०२१ च्या अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.
संपादकीय भूमिका
|